Washim News

Washim News : समृद्धी महामार्गावर कार उलटून भीषण अपघात; 4 जण जखमी

512 0

वाशिम : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील (Washim News) शेलुबाजार जवळ जंगली जनावर आडवं आल्यामुळे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या दुरतकर कुटुंबतील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

समृद्धी लोकेशन 196 जवळ हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच कार्ड लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण, डॉक्टर सोहेल खान यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!