Team India

ODI Ranking: आयसीसीची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ बॉलरने घेतली अव्व्ल स्थानी झेप

706 0

नुकत्याच झालेल्या आशिया कप 2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली (ODI Ranking) टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. यामध्ये अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. याचा फायदा आता टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत झाला आहे. यानंतर आता आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे.

क्रमवारीत मोठा उलटफेर
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोलंबोत श्रीलंकेला 50 धावांवर गुंडाळणाऱ्या मोहम्मद सिराजने आयसीसी वन डे क्रमवारीत जबरदस्त झेप घेतली आहे. मोहम्मद सिराज आपल्या करिअरच्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. यादरम्यान त्याने हेजलवूड, ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिशेल स्टार्क या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. या आधी मार्च 2023 मध्ये सिराज नंबर वन गोलंदाज बनला होता.

Share This News
error: Content is protected !!