Breaking News
Narendra Modi

Narendra Modi : गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या मराठीतून मंगलमय शुभेच्छा, म्हणाले…

786 0

मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. दरम्यान आज गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!” असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोदेखील मोदी यांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेला फोटो मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Share This News
error: Content is protected !!