मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना (Crime Video) घडली आहे. यामध्ये एका 14 वर्षाच्या मुलाने वृद्ध व्यक्तीला चिरडले आहे. मुंबईतील चांदिवली परिसारत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अल्पवयीन मुलाने वृद्धाला धडक दिल्याने त्यांचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्धाला मुलाने दोनदा चिरडलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित मुलावर दंड ठोठावला असून त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
A 14-year-old hits a senior citizen at Nahar Amrit Shakti Road, Chandivali. Senior citizen is now advised to go on bedrest for the next 3 months. Parents penalised for 5K. This is a major safety concern for pedestrians when parents hand over their cars to kids. @CPMumbaiPolice… pic.twitter.com/TzkIJsr3wl
— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) September 13, 2023
काय आहे व्हिडिओमध्ये?
गाडी इमारतीतून बाहेर पडताना मुलाचे नियंत्रण सुटले. गाडीने बाहेर येताच रिक्षाला धडक देऊन तिथून जात असलेल्या व्यक्तीला दोनदा चिरडले. या अपघातात सुभरामन कृष्णन (63) हे गंभीररित्या जखमी झाले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याप्रकरणी साकी नाका पोलिसांनी अल्पवयीन मुलावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.