पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण (Pune Crime) खूप वाढले आहे. पुण्यातील हडपसरमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून धारदार लोखंडी हत्याराने वार करून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर पोलिसांकडून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.सनी रावसाहेब कांबळे (25) अमन साजिद शेख, आकाश हनुमंत कांबळे,जय शंकर येरवळे यांच्यासह आणखी दोघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींनी संगनमत करुन पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्याऱ्याने अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर हल्ला करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यवाहीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.