aditya-L1

Aditya L 1 : आदित्य एल 1 ला मोठे यश! इस्रोने ट्विट करून दिली माहिती

541 0

गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशीच आदित्य एल-1ने (Aditya L 1) देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे. आदित्य एल 1 मंगळवारीच पाचव्यांदा आपली कक्षा बदलणार आहे. मात्र, त्याआधी सोमवारी आदित्य-एल1 मिशनबाबत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे.

इस्रोने आपल्या ट्विटमध्ये नेमके काय म्हंटले?
आदित्य-L1 मध्ये स्थापित केलेल्या STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50 हजार किमी पेक्षा जास्त अंतरावर सुपर-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजणे सुरू केले आहे, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. आदित्य-एल1 जो डेटा गोळा करेल तो शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करेल यामुळे इस्रोला मोठी मदत होणार आहे.

आदित्य एल-1 हे 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याचे रहस्य समजण्यास मदत होणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागून राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी पार पडली होती.

Share This News
error: Content is protected !!