Saswad Municipality : सासवड नगरपालिका हद्दीमध्ये कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करावी – डॉ उदयकुमार जगताप

341 0

पुणे : सासवड हद्दी मध्ये (Saswad Municipality) भोंगळे पेट्रोल पंप जवळ,धन्वंतरी हॉस्पिटल जवळ नागरिक कचरा टाकून शहर विद्रूप व अस्वच्छ करीत आहेत. अशा नागरिकांना नगरपंचायती नगरपालिका अधिनियम 1966 च्या कलम 229 अन्वये वातावरण दूषित करून इतर नागरिकांना उपद्रव केल्याबद्दल द्रव्य दंडाची शिक्षा करावी ही विनंती.

आपल्या स्वच्छ्ता विभागास स्वच्छ्ता करण्याच्या सूचना द्याव्यात.नोटीस दर्शविणारे फलक लावण्यात यावेत.अशा प्रकारचे स्पॉट शोधून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत म्हणजे कारवाई करणे सोपे जाईल अशा आशयाचा अर्ज डॉ उदयकुमार वसंतराव जगताप सासवड पुणे यांनी मा. मुख्याधिकारी, सासवड नगरपालिका यांना दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!