Crime News

Crime News : कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

503 0

आपले लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. सगळीकडे याची तयारी सुरु असताना कोकणातील बांदा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये गणपतीची आरास करताना विजेचा धक्का लागून सरमळे-देऊळवाडी या ठिकाणी एकाचा मृत्यू झाला. रमाकांत शिवराम परब (वय 50) असे त्यांचे नाव आहे.

काय घडले नेमके?
कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे. रमाकांत परब हे काल सकाळी घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर उभे राहून ते वायरिंग करत होते.त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

रमाकांत परब हे खासगी आराम बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. रमाकांत परब यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बांदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून परब यांचा मृतदेह सायंकाळी उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या माघारी पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!