Raigad Accident

Raigad Accident : भरधाव एसटी बसची ट्रकला धडक; 20 जण जखमी

618 0

रायगड : राज्यात सध्या अपघाताचे (Raigad Accident) प्रमाण खूप वाढले आहे. रायगडमध्ये अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये मुंबईकडून कोकणात राजापूर येथे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. एसटीने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीमधील जवळपास सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात रायगड जिल्ह्यात गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाला आहे.

हा भीषण अपघात आज रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. माणगाव आणि गोरेगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदत करून जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या सगळ्या जखमी प्रवाशांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघात एकूण 30 ते 35 प्रवाशी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातातील जखमींची नावे
उज्वला बाळाराम कांबळे (50) डोंगरोली, राकेश विठ्ठल मारे (34) चापडी, अर्थव विनोद तारले (14) डोंबिवली, वैष्णवी विनोद तारले (36), मंगला गंगाराम बावदाणे (23), शुभम प्रभोद मयेकर (14), प्रियंका प्रमोद मयेकर (44), किर्ती विनायक पुरोहित (29), ईश्वरी विनोद तारले (10) सर्व राहणार डोंबिवली, दिप्ती दिनेश तारले (32), धनश्री चंद्रकांत पांगेरकर (34), अक्षय अनंत घाडी (22) ठाणे, अंकिता चंद्रकांत नागव (26), विनोद तारले (38), नेहा अनंत आंबेरकर (43) धारावी, विनोद अनंत आंबेरकर (52), तुकाराम परशुराम घाडी (70) डोंबिवली, तन्मय विनोद आंबेरकर (15) धारावी, अविता चंद्रकात नागम (23), चंद्रकांत विजय पंगेनरकर (39), धनश्री चंद्रकांत पंगेनरकर (34), मानवी चंद्रकांत पंगेनरकर (11), आदित्य वासुदेव घडी (18) विरार, सिधिका शशिकांत बिरजे (27) राजापूर, विवेक चंद्रकांत पंगेनकर (16) डोंबिवली, ज्ञानदेव हरी जाधव (70) डोंबिवली, प्रमोद अशोक मयेकर (48) डोंबिवली, संजय शशिकांत बिरजे (18) राजापूर, प्रमिला प्रभाकर घाडे (44) राजापूर, मनोहर मुकुंद मुलाम (58) राजापूर, श्वेता शशिकाम बिरजे (45) राजापूर, युवहान बाबुराव बनसोडे (35) राजापूर, आराध्या शशिकांत बिरजे (9) राजापूर, महेश रमेश मुंडेकर (49) इंदापूर अशी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!