Narendra Modi Video

Narendra Modi Video : ‘तुम जिओ हजारो साल…’ मेट्रोमध्ये महिलांनी पंतप्रधान मोदींसाठी गायलं गाणं

589 0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Video) यांचा आज वाढदिवस आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होर्डिंग्स, शुभेच्छांचे मेसेज, सोशल मीडियावर व्हिडीओ तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये काही महिला मेट्रोमध्ये नरेंद्र मोदींसाठी गाणे गाताना दिसत आहेत.

द्वारका सेक्टर 21 मेट्रो स्टेशनपासून नवीन द्वारका सेक्टर 25 मेट्रो स्टेशनपर्यंत विमानतळ एक्सप्रेस लाइनच्या विस्ताराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी महिला प्रवाशांनी टाळ्या वाजवून आणि ‘हॅप्पी बर्थडे मोदी जी’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी आज त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!