Government Scheme

Government Scheme : गोष्ट तुमच्या कामाची माहिती शासकीय योजनांची; काय आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज योजना?

667 0

नवीन व्यवसाय करणाऱ्या युवकांना 15 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी महाराष्ट्र शासनाची बिनव्याजी कर्ज योजना (Government Scheme) .अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना. 15 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवाल?

योजनेचे स्वरूप
महाराष्ट्र शासनाची मराठा समाजातील युवक /युवतीसाठी जे उद्योग, व्यवसाय उभारु इच्छित त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी योजना आहे. मराठा समाज किंवा मराठा समाजा इतर ज्या समाजामध्ये महामंडळ स्थापन झाले नाही अशा समाजातील युवकांसाठी 15 ते 50 लाखापर्यंत कर्ज महाराष्ट्र शासनामार्फत बिनव्याजी पुरवलं जाते. सदर योजना दोन पद्धतीने केली जाते पहिली म्हणजे वैयक्तिक कर्ज परतवा योजना आणि ग्रुप कर्ज परता योजना. वैयक्तिक कर्ज प्रकरण योजनांमध्ये एखाद्या व्यक्तीला 15 लाखापर्यंत कर्ज महामंडळाकडून आणि बँकेकडून मिळू शकतं आणि ग्रुप कर्ज प्रकार योजनेमध्ये एक व्यक्ती असेल तर 15 लाख दोन व्यक्ती असेल तर 25 लाख तीन व्यक्ती असतील तर 35 लाख चार व्यक्ती असेल तर 45 लाख आणि पाच व्यक्ती असेल तर 50 लाख अशा स्वरूपात हे कर्ज मिळतं.ती योजना नेमकी काय आहे ते योजनेचे स्वरूप काय आहे पात्रता काय कागदपत्र काय आदी सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत.

पात्रता
1) मराठा समाज किंवा समाज व्यतिरिक्त ज्या समाजासाठी महामंडळ स्थापन नाही अश्या नागरिकांसाठी ही योजना आहे.
2)इतर कुठल्याही महामंडळ चा योजनेचा फायदा घेतला नसावा
3)वय पुरुष 18 ते 50 वर्ष
महिला 18 ते 55 वर्ष
4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असता कामा नये

कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
5)उद्योग आधार / शॉप ऍक्ट
6)it रिटन किंवा तलाठी उत्पन्न दाखला
7)प्रोजेक्ट रिपोर्ट

प्रक्रिया
अण्णासाहेब पाटील महामंडळच्या mahaswyam.com या वेब साईड वर जाऊन आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. महामंडळ संमती पत्र (LOY Lettr ) आधी मिळवण्यासाठी प्रक्रिया करावी लागेल त्यानंतर सर्व कागदपत्र आणी loy लेटर बँकेत सबमिट करावे लागेल. ते सगळ्या कागदपत्राचे पूर्तता केल्यानंतर आणि बँकेने सगळे काम कागदपत्राचे शहाणी केल्यानंतर बँक तुम्हाला कर्ज मंजूर करते. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर तुम्हाला परत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन बँकेने कर्ज मंजूर केल्याचे लेटर्स दिसबसमेंट लेटर आणि ज्या खात्यामध्ये बँकेची अमाऊंट तुम ट्रान्सफर झाली आहे त्या बँकेचे स्टेटमेंट आणि ईएमआय लेटर हे घेऊन हे सर्व अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. त्यानंतर ज्यावेळी तुमचा पहिला ईएमआय बँकेतून जाईल त्यावेळी ज्या बँकेच्या खात्यातून तो एम आय गेला आहे त्या बँकेचे खात्याचं स्टेटमेंट हे आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटवर प्रत्येक महिन्याला अपलोड करावा लागेल यानंतर तुम्हाला तुमचं व्याज जे बँकेतून कट झाले आहे ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला परत मिळेल हे खरंतर व्याज परतावा योजना असल्यामुळे प्रत्येक महिन्याला तुम्हाला व्याज अधिक मुद्दल हा हप्ता बँकेतून कट झाल्यानंतर त्याचे स्टेटमेंट अपलोड करावे लागेल त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमचं कट झालेले व्याज परत मिळणार आहे. तुमचा कर्जाच्या व्याजावरील 12% पर्यंत व्याज हे महामंडळ परत तुम्हाला परत देते याची मर्यादा पाच ते सात वर्षाची आहे.

Share This News
error: Content is protected !!