Suicide News

Suicide News : सासूच्या टोमण्यांना वैतागून वर्षभरातचं विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

697 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना (Suicide News) घडली आहे. यामध्ये एका छोट्याशा कारणावरून एका विवाहितेने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. लग्न झाल्यानंतर सुनेचा सासूशी होणारा वाद काही नवीन नसतो, परंतु हाच वाद टोकाला गेला तर काय घडू शकते याचा प्रत्यय तुम्हाला या घटनेमध्ये येईल. खडक पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सायली सौरभ भागवत (वय 22, रा. दत्तवाडी, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे तर राजेश्री राजेंद्र भागवत असे सासूचं नाव आहे. रवी अनिल अहिरे ( वय 39, रा, हिराबाग पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू राजेश्री राजेंद्र भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायली सौरभ भागवत हिचा राजेश्री राजेंद्र भागवत हिच्या मुलाशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सासू राजेश्री ही सायली हिला वारंवार टोमणे देऊन तिचा मानसिक छळ करायची. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खालच्या पातळीचे शब्द प्रयोग सातत्याने करायची असा आरोप करण्यात आला आहे.

घटनेच्या दिवशी सुनेला उपाशी पोटी ठेऊन, तिच्या नवऱ्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडले, तसेच तिला रात्री दोन वाजताच्या सुमारास घराबाहेर हाकलून दिले. या जाचाला कंटाळून सायली हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या सायलीच्या माहेरच्यांकडून करण्यात आला आहे. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस एल एन सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!