Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! मुलाच्या खोलीत प्रवेश करताच समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांना बसला मोठा धक्का

912 0

बुलढाणा : बुलढाण्यामध्ये (Buldhana News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मानसिक तणावातून स्वतःच्या हाताने गळा चिरुन घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. खामगाव शहरातील अनिकट रोड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. आकाश प्रमोद खाकरे (28) याने 13 सप्टेंबरला रात्री राहत्या खोलीत चाकुने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. सकाळी जेव्हा घरचे त्याच्या खोलीत गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून कुटुंबीय हादरले. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत.

काय घडले नेमके?
खामगाव शहरातील अनिकेट भागातील आकाश प्रमोद खाकरे हा युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. दरम्यान काल रात्री त्याने स्वःच्या रूममध्ये जाऊन धारदार चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आपल्या आयुष्याचा शेवट केला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे खाकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी मृत आकाशचे काका अजय खाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide