Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर; नामकरण फलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

815 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाने दुमदुमला होता.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे औरंगाबाद येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या अनावरणाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला असल्याचे पाहायला मिळाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!