Kishori Pednekar

Kishori Pednekar : डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांचा पासपोर्ट EOW कडून जप्त

599 0

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोविड काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात EOW कडून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या दोन बँक खात्यांचं स्टेटमेंटही ईओडब्लूला सादर केलं आहे. किशोरी पेडणेकर यांची कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु आहे.

आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. कोविड काळात वाढीव दरात डेड बॉडी बॅग खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान अटकेपासून संरक्षण देतानाच तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश पेडणेकर यांना उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. आज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला

काय आहे नेमका घोटाळा?
कोरोना काळात कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांसाठी लागणाऱ्या डेड बॉडी बॅग या जादा दराने खरेदी केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.या प्रकरणात उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. सोबतच त्यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!