Mumbai Fire News

Mumbai Fire News : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग

394 0

मुंबई : मुंबईतील कुर्ल्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एका इमारतीला भीषण आग (Mumbai Fire News) लागली. ही आग एवढी भीषण होती कि यामध्ये 39 रहिवाशी जखमी झाले आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे 50-60 जणांना सुखरूप बाहेर काढले. ही आग नेमकी कशामुळं लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय घडले नेमके?
कुर्ला पश्चिम भागातील कोहिनूर हॉस्पिटलजवळील एसआरए इमारतीत ही आग लागली. अग्निशमन विभागाने ही आग लेव्हल-1ची असल्याची माहिती दिली. ही आग तळमजल्यापासून 12व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिक डक्टमधील स्क्रॅप मटेरियल इत्यादींपर्यंतच ही आग मर्यादित होती. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

या दुर्घटनेत आगीमुळे गुदमरल्याचा त्रास झाल्यामुळे 39 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 39 जणांपैकी 35 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर इतर चार जणांना कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!