Nalasopara Crime

Nalasopara Crime : रक्षकच बनला भक्षक ! पोलीस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

665 0

नालासोपारा : मुंबईतील नालासोपारा या ठिकाणाहून (Nalasopara Crime) खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका वकिल महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करत होता असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

मल्हार धनराज थोरात असं आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच नाव आहे. तो पालघर पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी होता. त्याने नालासोपारा, वालीव आणि दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी काम केलं आहे. पीडित महिला ही 33 वर्षाची असून, ती व्यवसायाने वकिल आहे. आरोपी थोरातने पीडितेला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ नवऱ्याला पाठवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत असे. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरातने पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला.

तसेच आरोपी पोलीस हा तक्रारदार पीडित महिलेचे व्हॉटसॲपवर त्याने नग्न व्हिडीओ आणि फोटो मागवत असे. आरोपीने पीडितेवर कारमध्ये, विविध लॉज, हॉटेलमध्ये बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. आरोपी हा पीडितेबरोबर जबरदस्ती अनैसर्गिक दुष्कृत्य करत होता. सध्या आरोपी मल्हार थोरात हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!