Sunil Shroff Passed Away

Sunil Shroff Passed Away : बॉलिवूड अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन

629 0

बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन (Sunil Shroff Passed Away) झाले आहे. त्यांचे नेमके कशामुळे निधन झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. ओएमजी 2′ हा सुनील श्रॉफ यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. सुनील श्रॉफ यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रियो आणि सुनील यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

सुनील श्रॉफ यांची शेवटची पोस्ट व्हायरल
सुनील श्रॉफ यांनी 17 ऑगस्ट 2023 रोजी आपली शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ते उत्साहात ईद साजरी करताना दिसत आहेत. ईद मुबारक या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. सुनील श्रॉफ यांनी शर्मिला टागोर आणि राधिका मंदाना यांच्यासोबत जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

सुनील श्रॉफ यांची कारकीर्द
सुनील श्रॉफ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ‘शिद्दत’,’द फायनल कॉल’,’कबाड द कॉइन’,’जूली’,’अभय’ अशा अनेक सिनेमांत सुनील श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत होते. डॉक्टर आणि वडिलांची भूमिका त्यांनी अनेकदा साकारली आहे. खिलाडी कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड 2’ हा सिनेमा सुनील श्रॉफ यांच्या कारकिर्दीतील अखेरचा सिनेमा ठरला आहे.

Share This News
error: Content is protected !!