Crime

Pune Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! अज्ञात व्यक्तीने नवजात बाळाला फेकले नाल्यात

489 0

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील एम आय डी सी भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत (Pune Crime News) माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बालाजी नगर येथील नाल्यात पुरुष जातीच्या एका नवजात बाळाला फेकून दिल आहे. या नवजात बाळाचे भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

ही गोष्ट काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने नवजात बाळाच्या मृतदेहाला नाल्यातून बाहेर काढले. या नवजात बाळाला नाल्यात फेकणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी भोसरी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!