Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी दुसऱ्यांदा शरद पवारांसोबत ‘त्या’ बैठकीला येणं टाळलं

518 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची शुक्रवारी मांजरी येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची याआधी एक बैठक झाली होती. अजित पवार त्या बैठकीला गैरहजर होते. मात्र त्याच दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी भेट झाली होती. मात्र आज होणाऱ्या बैठकीसाठी अजित पवार गैरहजर राहिले असून ते दौंडला गेले. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमके काय सुरु आहे? याची चर्चा संपूर्ण वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित तसेच अजित पवारांच्या सोबत गेलेले दिलीप वळसे पाटील हे देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचे संचालक आहेत.

शरद पवार गटाचा अजित पवार गटाला दणका
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं एक्स हँडल (पूर्वीचे ट्वीटर) सस्पेंड करण्यात आलं होतं. या ट्विटर हँडलवर अकाऊंट सस्पेंड असल्याचा मेसेज दिसत होता. शरद पवार गटाने या ट्विटर हँडलच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आली होती. अजित पवार गटाने नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं होतं.

Share This News
error: Content is protected !!