गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Couple Sex Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता विमानातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इझीजेट फ्लाइटमध्ये बसलेले एक जोडपे टॉयलेटमध्ये सेक्स करताना पकडले गेले आहे. या जोडप्याचा टॉयलेटमध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओमध्ये एका फ्लाइट अटेंडंटने टॉयलेटचा दरवाजा उघडताच हे जोडपे सेक्स करताना पकडले गेले होते. फ्लाइटमधील सगळ्या प्रवाशांनीही या जोडप्याला टॉयलेटमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. इझीजेटचे फ्लाइट ल्युटनहून इबीझाला जात होते त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
https://twitter.com/rose_k01/status/1701914984123703702
स्टाफ मेंबरने टॉयलेटचा दरवाजा उघडताच हे जोडप्याचा प्रताप फ्लाइटमधील इतर प्रवाशांसमोर आला. या जोडप्याला आक्षेपार्ह स्थितीत पाहून विमानातील प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या जोडप्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून कर्मचारी हसला आणि त्याने लगेचच दरवाजा बंद केला. यानंतर विमान इबीझामध्ये उतरल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला विमानातून बाहेर काढले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.