Jalgaon News

Jalgaon News : बाप की हैवान! 8 दिवसांच्या चिमुकलीची केली हत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

432 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका निर्दयी बापाने अत्यंत क्रूरपणे आपल्या 8 दिवसांच्या चिमुकलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून एखादा बाप इतका निर्दयी कसा असू शकतो असा प्रश्न पडतो. अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात बापाने तंबाखू कोंबून तिची हत्या केली. इतक्यावरच हा हैवान बाप थांबला नाही. त्याने चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाटदेखील लावली. आशा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाकोद येथील हरिनगर तांडा येथे राहत असलेल्या गोकुळ गोटिराम जाधव या इसमास अगोदर दोन मुली होत्या, त्यानंतर तिसरं अपत्य देखील मुलगीच झाल्यानं गोकुळ गोटीराम जाधव याचा संताप अनावर होऊन त्यानं आपल्या आठ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबली आणि तिला तसंच पाळण्यात झोपवलं. यानंतर तंबाखूच्या विषानं आठ दिवसांच्या या चिमुकलीनं काही वेळातच प्राण सोडला. सकाळी नराधम बापानं चिमुकली आजारी असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. आरोपी पित्यानं जवळच्याच परिसरात पोटच्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले.

अशाप्रकारे घटना आली उघडकीस?
या सर्व प्रकाराची माहिती त्या परिसरातील आशा सेविकांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली होती. वरिष्ठांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकार कानावर घातला, तसेच, अनेक शंकाही उपस्थित केल्या. पोलिसांनी सर्व प्रकरण जाणून घेऊन तात्काळ आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाचा पोलिसांनी गोपनिय तपास सुरू केला. आरोपी गोटीराम जाधव यानंच हा खुनाचा धक्कादायक प्रकार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी हूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!