ICC ODI World Cup Timetable

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 चे मुंबई, पुण्यासह ‘या’ 10 स्टेडिअमवर रंगणार सामने

880 0

5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 आयसीसी वर्ल्ड कप रंगणार (World Cup 2023) आहे. संपूर्ण टुर्नामेंट भारतातच होणार आहे. एकूण 48 मॅच होणार आहेत, ज्या भारतातील 10 स्टेडिअमवर खेळवल्या जाणार आहेत. आज आपण या 10 स्टेडिअमची खासियत जाणून घेणार आहोत…

1) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद – जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम. वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात आणि शेवट इथंच होणार आहे. भारत विरुद्ध पाकसह एकूण 5 मॅच इथं होणार. इथं एक लाखांहून अधिक लोक बसून मॅच पाहू शकतात.

2) राजीव गांधी स्टेडिअम, हैदराबाद – इथं तीन मॅच होणार आहेत. भारताची एकही नाही पण पाकिस्तानच्या दोन मॅचेस इथं आहेत. 45 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेलं हे स्टेडिअम.

3) एचपीसीए स्टेडिअम, धर्मशाला – हिमाचल प्रदेशसारख्या सुंदर ठिकाणी असलेले हे स्टेडिअम इथंही पाच मॅच होणार. इथं 23 हजार लोक बसू शकतता. इथं भारत आणि न्यूझीलंड सामना होणार. वेगवान बॉलर्ससाठी हे स्टेडिअम उत्तम आहे.

4) अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली – इथंही 5 मॅच होणार आहेत. त्यापैकी एक भारताची अफगाणिस्तानसोबत आहे. या स्टेडिअमची क्षमता 41 हजार लोकांची आहे. इथं रन खूप होतात.

5) एम चिदंबरम स्टेडिअम, चेन्नई – चेपॉक म्हणून फेमस असलेलं हे स्टेडिअम भारतातील मोठ्या क्रिकेट सेंटरपैकी एक. या स्टेडिअमचं मैदान स्पिनर्ससाठी चांगलं आहे. इथं 50 हजार लोकांची क्षमता आहे. इथं भारत ऑस्ट्रेलिया भिडणार आहेत.

6) इकाना स्टेडिअम, लखनऊ – टुर्नामेंटसाठी इथं वेगळं पीच तयार करण्यात आलं आहे. इथं पाच मॅच होतील. भारत-इंग्लंड सामनाही इथं होणार आहे. याची क्षमता 50 हजार आहे.

7) एमसीए स्टेडिअम, पुणे – सर्वोत्तम पिच क्वालिटी आणि नव्या सोयीसुविधा असलेले हे स्टेडडिअम. याची क्षमता 37 हजारांपेक्षा अधिक आहे. पाच मॅचेस होणार. त्यैपकी एक भारत विरुद्ध बांगलादेश.

8) चिन्नास्वामी स्टेडिअम, बंगळुरू – बॅट्समनसाठी उत्तम स्टेडिअम कारण इथं बाऊंड्री लहान आहे. इथं 32 हजार लोक बसू शकतात. इथंही पाच मॅच होणार आहे. टीम इंडिया क्वॉलिफायर्समार्फत टुर्नामेंटच्या क्वालिफाइ टिमशी भिडेल.

9) वानखेडे स्टेडियम, मुंबई – 2011 वर्ल्ड कपची फायनल इथंच झाली होती. आता 2013 वर्ल्ड कपची सेमी फायनलची पहिली मॅच होणार आहे. टीम इंडिया इथं क्वॉलिफायर्स टीमशी भिडेल. इथं 32 हजारांची क्षमता आहे.

10) ईडन गार्डन, कोलकाता – या स्टेडिअमवर कित्येक ऐतिहासिक मॅच खेळवल्या गेल्या आहेत. सेमी फायनलच्या दुसऱ्या मॅचसह इथं 5 मॅच होणार आहे. त्यापैकी एक भारत आणि साऊथ आफ्रिकेची आहे. बॅट्समॅन आणि बॉलर्स दोघांसाठी हे स्टेडिअम चांगलं आहे.

Share This News
error: Content is protected !!