Pune News

Pune News : पुणे हादरलं ! दाजीची हत्या करून मेव्हण्याचीदेखील आत्महत्या

771 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने आपल्या दाजीच्या डोक्यात रॉड घालून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर मेव्हण्याने स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दाजीचे नाव धनंजय पद्माकर ताडेकर (वय 36) आणि आरोपी मेव्हण्याचे नाव हेमंत रत्नाकर काजळे (वय 40) असे आहे. या घटनेमुळं कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. धनंजय साडेकर याचा काजळे यांच्या बहिणीशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतरही त्यांच्यात सतत वाद होत होते. बहिणीसोबत वाद घालत असल्याच्या रागातून काजळे यांने धनंजयला जाब विचारला यातून दोघात वाद झाला आणि ही घटना घडली.

साडेकर यांच्या डोक्यात हेमंत काजळे यांनी लोखंडी गज मारला. डोक्यात गज लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व अति रक्तस्त्राव झाला. यानंतर या घटनेची माहिची काजळेने बहिणीला कळवली आणि त्यानंतर त्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. बहिणीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. चतुःश्रृंगी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!