Beed News

Beed News : बीडमध्ये भीषण अपघात ! आईसह 2 लेकरांचा जागीच मृत्यू

1901 0

बीड : बीडमध्ये (Beed News) एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये आईसह २ लेकरांचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड वडवणी रस्त्यावर गोरक्षनाथ टेकडीजवळ भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

काय घडले नेमके?
धारूरकडून वडवणी मार्गे बीडकडे रिक्षामध्ये शेख कुटुंब आपल्या घरी परतत असताना बीडहून भरधाव वेगाने आयशर टेम्पो या दोन्हीची वडवणी बीडमध्ये गोरक्षनाथ टेकडीजवळ जोराची धडक झाली. यात रिक्षामध्ये बसलेले शेख कुटुंबातील नसरीन अजीम शेख (वय वर्ष 35) तर त्यांची दोन मुलं एक नुमान अजीम शेख (वय वर्ष 13) तर दुसरा मुलगा आदम अजीम शेख (वय वर्ष 12) असा तिघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातामध्ये रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील तीन व्यक्ती ठार झाल्याने शेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!