पुणे : नितेश राणे पुण्यात आले (Pune News) आणि त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या विरोधात निदर्शन केली. खरतर शहरातील अनेक वाघांपैकी एका वाघाने पुढे येउन अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे. देशातील नेते राहुल गांधी यांची खासदारकी सुडबुध्दीने कारवाई करून रद्द करण्यात आली.
इथे तर जाहीररीत्या सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करून, शिविगाळ करून धमकी देण्यात आली. मनपाच्या अधिकाऱ्यांना कामकाजाविषयी 48 तासांची मुदत देण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या अशी मुदत देणे योग्य नसताना असला बोलघेवडेपणा पुण्यात येउन करण म्हणजे एक स्टंट आहे. प्रसिध्दीसाठी पुणे शहर यांना सॉफ्ट टार्गेट वाटत आहे.
मग या नितेश राणेची आमदारकी का रद्द करण्यात येउ नये? पुणे भारतीय जनता पार्टीचे कोणीही नेते ना अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आणि ना नितेश राणे यांच्या समर्थनार्थ पुढे आले. पुण्यातील भाजपचे नेते हे एकतर बिल्डर आहेत, नाहीतर बिल्डरांचे हस्तक आहेत. त्यांना ना अधिकाऱ्यांची पडली ना नितेश राणे यांची. आगामी निवडणुकीत पुणेकर यांना यांची जागा दाखवून देतील.