Supriya Sule

Supriya Sule : अजित पवारांना पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

803 0

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची चर्चा आहे. या शोचा तिसरा सीझन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी आपल्याला हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक हे लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते हे करतात. या कार्यक्रमात येणारा पाहूणा हा नेहमीच त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बोलताना दिसतो. आता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. त्यांनी हजेरी लावल्यानंतर आता शोमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे यांना त्यांचे चुलत भाऊ अजित पवार यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील व्हिडिओ झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. रविवारी प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला सुप्रिया सुळे पाहायला मिळणार आहेत. त्या निमित्तानं एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया यांच्या आठवणी…. या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्यासोबतच्या काही फोटोंचा एक व्हिडीओ सुप्रिया सुळे यांना दाखवण्यात आला आहे. अजित पवारांसोबतचे ते फोटो पाहून सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या कॅमेऱ्यासमोर रडू लागल्या. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बंड पुकारल्यानं राष्ट्रवादीत फूट पडली. राष्ट्रवादी सोडत अजित पवार यांनी भाजपाबरोबर सत्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर फक्त शरद पवार नाही तर सुप्रिया सुळे यांना देखील खूप वाईट वाटलं. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आतापर्यंत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता जितेंद्र जोशी, समीर वानखेडे, सई ताम्हणकर, अमोल कोल्हे, देवेंद्र फडणवीस पासून अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी यांनी हजेरी लावली आहे.

Share This News
error: Content is protected !!