पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती ; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिले “हे” आदेश

324 0

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ काल (ता.14 मार्च) रोजी संपला असून आता पुणे महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे पालिका आयुक्त विक्रम कुमार आता प्रशासक म्हणून आजपासून पुणे महानगरपालिकेचा कारभार पाहणार आहेत. 

प्रशासक म्हणून सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी सर्व खातेप्रमुख, विषय प्रमुख, उपायुक्त यांनी सोमवार ते गुरुवार यादिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून त्याचे निवारण करावे त्याचबरोबर सर्व अतिरिक्त आयुक्तांनी दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे आदेश दिले आहेत.