4 राज्यात भाजपानं केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती ; अमित शहा यांच्याकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी

249 0

विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केली आहे.पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्ये भाजपच्या ताब्यात आली आहेत. 

भाजपने उत्तर प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

अमित शहा यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी –

आता भाजपने या राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी केंद्रीय नेते राज्यांमध्ये पाठवले जाणार असून मंत्र्यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास यांना यूपीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी यांची उत्तराखंडमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मणिपूरमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू निरीक्षक म्हणून जाणार आहेत. नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना गोव्यात निरीक्षक बनवण्यात आले आहे. या सर्व राज्यांमध्ये गोवा हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण 40 सदस्यांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. पण 20 जागांसह भाजप नक्कीच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, चार दिवस उलटले तरी भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीत 40 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या होत्या. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन सदस्यांनी आधीच भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप सहज सरकार स्थापन करू शकतो.

Share This News

Related Post

चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 13, 2022 0
पुणे- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. चित्रा वाघ…

काँग्रेसला मोठे खिंडार ! गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 64 नेत्यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

Posted by - August 30, 2022 0
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मागच्याच आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. गुलाम नबी आझाद हे…

बदल हा सृष्टीचा नियम पण… शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सुषमा अंधारें चं भावनिक पत्र

Posted by - May 3, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तिचं पडतात असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे…
Prashant Damle

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती.…

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

Posted by - July 8, 2022 0
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *