Gautami Patil

Gautami Patil : अर्रर्र…! स्टेजवर डान्स करताना धपकन पडली गौतमी पाटील; Video व्हायरल

1531 0

सांगली : आपल्या नृत्यशैलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीचे लाखो चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. तिच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. त्या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. त्यानंतर गौतमी पुन्हा एकदा गौतमी पाटील एका कार्यक्रमात दिसली. मात्र, यावेळी गौतमी पाटील तिच्या डान्समुळे नाहीतर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती एका कार्यक्रमात डान्स करताना स्टेजवर पडली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
गौतमीनं सांगली जिल्ह्यातील तरुण भारत स्टेडियम येथे पार पडलेली दहीहंडी स्पर्धेत हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील गोविंदा पथकांनी ज्या प्रकारे थर रचत हंडी फोडली ते पाहण्या जोगं होतं. यामध्ये तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाने 7 थरांचा थरारक मनोरा रचत हंडी फोडून 1 लाख 11 हजाराचे बक्षीस पटकावलं. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांसह कामगार मंत्री सुरेश खाडे,भाजपा खासदार संजयकाका पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितीत लावली होती. सांगली महापालिकेचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी या भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावण्यात आले होते. यादरम्यान डान्स करत असताना अचानक गौतमी स्टेजवर पडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गौतमी पडल्यानंतर लगेच तिचे बाऊंसर आले आणि त्यांनी लगेच तिला उचललं. मात्र, त्यानंतर देखील गौतमीनं तिचा डान्स थांबवला नाही. गौतमी उभी राहिली आणि पुन्हा नाचू लागली.

Share This News
error: Content is protected !!