Pune News

Pune News : केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण

496 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने तिला पट्ट्याने मारहाण केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने पैसे न दिल्याने आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके?
आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीने शनिवारी फिर्यादी पत्नीकडे केस कापण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र पत्नीने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करत तुझ्याकडे बघून घेतो म्हणत धमकी दिली. त्यानंतर कमरेच्या पट्ट्याने पत्नीला बेदम मारहाण केली. फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपीने तिला देखील हाताने आणि पट्ट्याने मारहाण केली.

उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना याप्रकरणी 47 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानुसार 56 वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!