पुतीन यांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे तरुणीला फुटला अश्रूंचा बांध

218 0

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मोठमोठ्या कंपन्यांना या युद्धाची झळ बसत आहे. अनेक कंपन्यांनी रशियामध्ये आपले कामकाज पूर्णपणे थांबवले आहे.

यानंतर रशियाकडूनही कठोर पावले उचलली जात आहेत. आता रशियामध्ये इंस्टाग्राम वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

रशियाने सोमवारी १४ मार्चला देशातील जवळपास ८ कोटी वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम बंद केले आहे. हा निर्णय इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी अतिशय धक्कादायक आहे. इंस्टाग्रामवरील रशियन इन्फ्लुएन्सर्सनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या फॉलोवर्ससाठी निरोप संदेश पोस्ट केला आणि त्यांना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला फॉलो करण्याचे आवाहन केले आहे.

पुतिन यांच्या या निर्णयाचा एका तरुणीला मोठा धक्का बसला असून यातून सावरणे तिला कठीण जात आहे. तिने टेलिग्राम या अ‍ॅपवरून रडत रडत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही तरुणी एक ब्युटी ब्लॉगर आहे. तिने या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “तुम्हीही असाच विचार करता का की इंस्टाग्राम हे केवळ माझ्या उत्पन्नाचा स्रोत आहे? इंस्टाग्राम माझ्यासाठी माझे आयुष्य आहे. माझी आत्मा आहे. यासोबतच मी झोपते आणि उठते. गेली ५ वर्षे मी इंस्टाग्रामचा वापर करत आहे.”

https://twitter.com/nexta_tv/status/1502433817465864198?t=F5JPkLgEb-rGMww4KZe9_Q&s=19

Share This News
error: Content is protected !!