Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी प्रमाणपत्र देण्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध

448 0

नागपूर : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Maratha Reservation) देण्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या महासंघाच्या बैठकीत हा विरोधाचा ठराव करण्यात आला. जालना येथे मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी संवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे. यावर आता महासंघाने आपली भूमिका आज जाहीर केली.

कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाने लादलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी असा ठराव या सभेमध्ये मांडण्यात आला.

या सभेला डॉ. बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरिकर, सुषमा भड, वृंदा ठाकरे, साधना बोरकर, नंदा देशमुख, रेखा बारहाते, अनिता ठेगरे, अनंता भारसाकळे, विक्रांत मानकर, परमेश्वर राऊत, अविनाश घागरे, प्रवीण डेहनकर, सुधाकर तायवाडे, रवींद्र राऊत, राम प्रसाद, शिवा भोयर, गजानन दांडेकर, गणेश हांडे, नीलेश तायवाडे, हरीश तळवेकर, पराग वानखेडे, शुभम वाघमारे, बाबा ढोबळे, विनोद हजारे, राजू चौधरी, ललित देशमुख, लीलाधर दाभे आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!