ऑक्टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांसह पीएमपी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ई-बसने सिंहगडाचा दौरा केला होता.नवीन वर्षात ही सेवा सुरू होण्याचे संकेत देखील पीएमपीने दिले होते.
ई बसेस करिता गडाच्या पायथ्याला पार्किंग जागा आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तर या बसेसच्या संचलनातून येणारे उत्पन्न देखील वनविभागाला देण्यात येणार आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याची नागरिक वाट पाहत आहेत.
Comments are closed.