Pune Metro Timetable Changed

Pune Metro Timetable Changed : पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यासाठी करण्यात आला ‘हा’ बदल

638 0

पुणे : पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा (Pune Metro Timetable Changed) प्रवास आता सुखकर होणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची प्रवाशांसाठी सेवा सुरू असते. पण काही तांत्रिक कारणास्तव उद्या पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

“उद्या दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी (केवळ एक दिवसासाठी) काही तांत्रिक कारणामुळे दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी 7.00 वाजतापासून (एक तास उशिरा) सुरू होईल, ह्याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.” असं ट्वीट पुणे मेट्रोकडून करण्यात आलं आहे.

लाईन 1 – पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक आणि लाईन 2 – वनाझ ते रूबी हॉल मेट्रो स्थानक या मार्गावर फक्त एका दिवसासाठी हा बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल पुणे मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. परवा म्हणजेच 11 सप्टेंबरपासून पुन्हा वेळापत्रक जशास तसे करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!