Sangli News

Sangli News : दुचाकींची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात ! प्रसिद्ध बिझनेसमनचा मृत्यू

519 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सांगली शहरातील काँग्रेस भवनजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एका प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

काय घडले नेमके?
चंद्रकांत विश्वनाथ पाटील (वय 52, रा. वरद हॉस्पिटलजवळ, सांगली) असे मृत बिझनेसमनचे नाव आहे. चंद्रकांत पाटील यांना गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी उपचारारम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ते दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर पडले. त्यावेळी काँग्रेस भवनजवळ आले असता समोरून भरधाव वेगाने दोघे तरूण दुचाकीवरून आले. त्यावेळी त्यांनी पाटील यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर जोरात आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

चंद्रकांत पाटील हे कुपवाड येथील स्मित टाईल्स इंडस्ट्रीजचे संचालक होते. तसेच ते सांगली येथील लायन्स नॅब हॉस्पीटलचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत होते. निसर्ग प्रेमी म्हणून त्यांचा लौकिक होता. याशिवाय मराठा उद्योजक फाउंडेशनचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. यामाध्यमातून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एका उद्योजकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!