Pankaja-Munde

Pankaja Munde : बीडमध्ये पंकजा मुंडेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; चर्चेला उधाण

420 0

बीड : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर संपूर्ण जिल्ह्यात लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती यात्रा आज बीडमध्ये येणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या तेलगावमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.

वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब
“भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे” असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या सर्व स्थानिक नेत्यांचे या बॅनरवर फोटो आहेत, माञ भाजपमधील कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो या बॅनरवर नाही आहे. या बॅनरखाली भारतीय जनता पार्टी धारूर असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत
दरम्यान दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या यात्रेला भव्य प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच ठिकठिकाणी जोरदार स्वागत होताना दिसत आहे. आता हि यात्रा बीडपर्यंत पोहोचली आहे. या यात्रेचा पंकजा मुंडे यांच्या राजकीय करिअरवर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!