पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या आक्रमक शैलीमुळे परिचित आहे. कोणतीही भीडभाड न ठेवता ते रोखठोक बोलतात. शनिवारी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकत्र आले. यावेळी शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात त्यांनी शिक्षकांना आरसा दाखवला. त्यांचे कान टोचले. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुनावले. यामुळे त्यांच्या भाषणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
काय म्हणाले अजित पवार
राज्य शासन शिक्षणावर 80 हजार कोटी खर्च करतो. शिक्षणासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळातील सहकारी कुठेही काटकसर करत नाही. कारण ज्ञान संपादन करण्याचे महत्व सर्वांना माहीत आहे. शिक्षकांच यश हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते. राजकारणात काम करत असताना माझा देखील शिक्षणसंस्थाचे काम करण्याचा अनुभव आहे. जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी या भागात शिक्षकांच्या संख्या कमी आहे. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत असतो.
चंद्रकांत पाटलांनादेखील दिला डोस
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उशिराने दाखल झाले. त्यावरुन अजित पवार यांनी त्यांना उपदेशाचे डोस पाचले. कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका. चंद्रकांत पाटील स्टेजवर असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.