Dhule News

Dhule News : भरधाव आयशर पलटी झाल्याने भीषण अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी अंत

704 0

धुळे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून (Dhule News) भाजीपाला घेऊन जाणारा आयशर भरधाव वेगात असल्याने अचानक उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने एका महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे. हि अपघाताची घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात सकाळच्या सुमारास घडली. डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे (वय 35) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे.

काय घडले नेमके?
सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दंतवैद्य म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे या शुक्रवारी सकाळी एमएच 18 बीव्ही 0751 क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्याहून सोनगीरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी धुळे तालुक्यातील सरवड फाट्याजवळ पाठीमागून येणारा आरजे 11 जीबी 8160 क्रमांकाचा भाजीपाल्याने भरलेला आयशर अचानक पलटला. त्याखाली डॉ. आदिती यांची दुचाकी सापडली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताचे वृत्त कळताच सरवड आणि सोनगीर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड आणि कर्मचारी दाखल झाले. महिला डॉक्टरला ट्रकच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. महामार्गावर ट्रक उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!