Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : सारे जहाँ से अच्छा! न्यू यॉर्कमध्ये अमृता फडणवीसांकडून देशभक्तीपर गीत सादर

554 0

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी न्यू यॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर प्लाझा येथे देशभक्तीपर गीत गायले आहे. त्यांच्या गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या गायनाचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

पेशाने बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांचे स्वतंत्र अल्बमही आले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या ‘चांद्रयान 3’ चे यशस्वी लँडिंगचे यश साजरे करण्यासाठी 27 आणि 29 ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या.

‘नाविका कॅपिटल’चे नवीन शाह आणि ‘रॉयल अल्बर्ट पॅलेस’चे अल्बर्ट जसानी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी न्यूयॉर्कमधील 700 ते 1000 भारतीय नागरिाकांशी संवाद साधला. तसंच, यावेळी त्यांना सारे जहाँ से अच्छा हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल अमृता फडणवीस यांचा सन्मानदेखील करण्यात आला. परराष्ट्र विभागाचे उपआयुक्त देव चौहान यांनी हा सन्मान प्रदान केला.

Share This News
error: Content is protected !!