Raja Shiv Chhatrapati Mahakavya

Raja Shiv Chhatrapati Mahakavya : मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’

3049 0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने (Raja Shiv Chhatrapati Mahakavya) प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्यानं एक अनोख कामं केलं आहे. शिवरायांवरील असलेल्या निष्ठेसाठी अवघ्या तीन महिन्यांत या युवकानं ‘राजा शिव छत्रपती महाकाव्य’ रचलं आहे. अहमद मोहम्मद शेख असे या मुस्लीम शिवभक्ताचे नाव आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या निमित्ताने ‘महाशिवकाव्य’ लिहून अहमद यांनी शिवरायांना आदरांजली अर्पित केली आहे.

कोण आहेत अहमद शेख ?
अहमद शेख हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येळंब गावचे रहिवासी आहेत. ते सध्या पुणे इथं वास्तव्यास आहेत. पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी रीसर्च अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तर त्यांची पत्नी संगणक अभियंता आहे.

साडेतीनशे पेक्षा जास्त कडवी
राजा शिव छत्रपती महाकाव्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त कडवी आहेत असल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली. रविद्र घाटपांडे यांच्या स्नेहल प्रकाशनतर्फे (पुणे) या राजा शिव छत्रपती महाकाव्याचे प्रकाशन होणार आहे. हे काव्य लिहण्याची संकल्पना मुंबईचे मित्र यदुनाथ देशपांडे सुचवली होती असे अहमद शेख म्हणाले. पुढच्या महिनाभरात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे शेख म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!