Gadchiroli News

Gadchiroli News : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी गाण्यावर धरला ठेका

378 0

गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) मोठी बातमी समोर येत आहे. नक्षलवाद्यांच्या दलामध्ये नवे सदस्य भरती झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी नृत्यावर ठेका धरला आहे. सध्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. घनदाट जंगलामध्ये एकमेकांच्या गळ्यात हात घालून नक्षलवादी नृत्य करताना दिसत आहेत. ढोल, नगाऱ्याच्या तालावर हे नक्षलवादी नृत्य करत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, की नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलामध्ये एकमेकांच्या गळ्यात हात घालून ठेका धरला आहे. ते नृत्य करत आहेत. ढोलाच्या ताावर हे नक्षलवादी नृत्य करत आहेत. नक्षलवाद्यांच्या दलामध्ये नवे सदस्य सहभागी झाल्यानंतर त्यांनी नृत्य करून हा आनंद साजरा केल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.

नक्षलवादी गडचिरोली आणि लगतच्या बस्तर जिल्ह्यात सक्रिय आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आपली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या नक्षलवाद्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!