Nashik News

Nashik News : साखरझोपेत असताना काळाचा घाला ! घराचा स्लॅब कोसळून आजोबा अन् नातवाचा दुर्दैवी मृत्यू

1046 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. तालुक्याील नळवाड पाडा येथे गुरुवार 7 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घराचा स्लॅब कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. तर यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे गुलाब वामन खरे यांच्या घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्याखाली तीन जण दाबले गेले. या दुर्दैवी घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर घराच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या आजीला दिंडोरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी तत्परता दाखवित जेसीबीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

विठाबाई वामन खरे (वय 80), गुलाब वामन खरे (60 वर्ष), निशांत खरे (3 वर्ष) यांच्या अंगावर स्लॅबचा काही भाग पडला. यात गुलाब वामन खरे आणि निशांत विशाल खरे यांचा मृत्यू झाला असून विठाबाई खरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच नळवाड पाडाचे सरपंच हिरामण गवळी यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह आणि काही ग्रामस्थांनी धाव घेतली. या दुर्घटनेमध्ये आजोबा अन् नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!