Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

501 0

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर (FIR) रद्द करण्यात आले आहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता.

Share This News
error: Content is protected !!