Gadchiroli Viral Video

Gadchiroli Viral Video : तलाठ्याच्या झाला तळीराम ! सातबाऱ्यावर सही करताना जमिनीवर कोसळला

844 0

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli Viral Video) सध्या दारू बंदी आहे. तरीदेखील जिल्ह्यात दारू पिण्याचं प्रमाण जास्त आहे. एवढेच नाहीतर सरकारी कर्मचारीसुद्धा कार्यालयांमध्ये दारू पिऊन येत आहेत. यामुळे अनेक लोकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. सध्या गडचिरोलीमधील कुरखेडा तालुक्यातील एका तलाठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सातबाऱ्याच्या कागदपत्रावर सही करत असतानाच दारुच्या नशेत असणारा तलाठी जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्याने एवढी दारू पिली होती कि त्याला त्याचा तोल सावरत नव्हता. सध्याचा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या सजा क्रमांक 8 सोनेरांगी येथे किशोर राऊत हे तलाठी पदावर कार्यरत आहेत. गेल्या 8 दिवसांपासून ते कार्यालयात मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. मात्र या तक्रारीची दाद कोणीही घेतली नाही. आता तलाठी किशोर राऊत यांचा थेट व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते दारुच्या नशेतच कार्यालयात बसल्याचं दिसतात. त्यांना आजुबाजूला काय चाललंय हेसुद्धा कळत नसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोनेरांगी गावातील काही शेतकरी शेतीविषयक कामासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर सही करण्याची विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असल्याने राऊत यांना सही करण्याचीदेखील शुद्ध नव्हती. सही करता-करता अचानक राऊत हे जमिनीवर कोसळले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आता सरकार या तलाठ्यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide