Pimpari Chinchwad News

Pimpari Chinchwad News : पिंपरीमध्ये चालत्या ओमनी कारने घेतला पेट

558 0

पिंपरी चिंचवड : आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास भोसरीतील एचपी पेट्रोल पंपा जवळ (Pimpari Chinchwad News) सीएनजीवर चालणाऱ्या मारुती सुझुकी ओमनी या कारने अचानक पेट घेतला. चालकांनं वेळीच प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एमएच 12/एएक्स 5787 ही ओमनी कार थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जात होती.

यानंतर तातडीने याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. कार पेटल्याने धुराचे लोट हवेत पसरले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बाहेरून बसवून घेतलेल्या सीएनजी किटमुळं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!