Satara News

Satara News : पुणे बंगळुरु महामार्गावर 4 गाड्यांचा विचित्र अपघात

7362 0

सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara News) प्रमाण वाढतच चालले आहे. धक्कादायक, भयानक अपघाताचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा चुकी नसतानादेखील काही लोकांना यामध्ये जीव गमवावा लागतो. असाच एक अपघात पुणे बंगळुरु महामार्गावर 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
पुणे बंगळुरु महामार्गावर सातारा जवळील खिंडवाडी येथे 4 गाड्यांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. पुण्याहून कोल्हापूरकडे जाणा-या उतारावर या चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात‌ दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता हा अपघात एवढा भीषण होता कि, कारचा पुढचा भाग पूर्ण चक्काचूर झाला आहे तर एका टेम्पोचीही धडक झाली असून त्याचाही पुढच्या भागाचं नुकसान झालं. अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याविषयी अधिक चौकशी करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!