Viral Video

Viral Video : नऊवारी साडी नेसून आजींनी डोक्यानं फोडली दहीहंडी; जोश बघून तुम्हीदेखील व्हाल थक्क

752 0

गोविंदा आला रे आला च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात (Viral Video) पार पडत आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत. ठाण्यासह मुंबई येथील दही हंडी उत्सव नेहमीच लक्षवेधी आणि चर्चेचा असतो. या उत्सवात आता मुलीही मागे नाहीत. मुलींची गोविंदा पथकेही आता मोठ्या प्रमाणावर तयार झाली आहेत. महिनाभर आधीपासूनच दहीहंडीची तयारी आणि सराव सुरु होतो. याच उत्साहात भर पाडणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्व महिला या दहीहंडी फोडण्यासाठी जमल्या आहेत. यावेळी या महिलांनी 2 थर लावले आहेत. तर हंडी फोडण्यासाठी या आज्जी दुसऱ्या थरावर चढल्या आहेत. व्हिडीओ पाहताना सुरुवातीला या आजी पडत आहेत की काय अशी भीती वाटते. मात्र दुसऱ्याच क्षणाला त्या आपल्या डोक्याने ही हंडी फोडतात. हे दृश्य पाहून भल्याभल्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल हौशेला मोल नाही..या वयातही आज्जींचा उत्साह पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!