महापालिकेत आजपासून ‘प्रशासकराज ‘ नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात

256 0

पुणे महानगरपालिकेचा कालावधी काल (ता.14 मार्च) रोजी संपली असून आता महापालिकेत प्रशासक राजवट असणार  आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने ते यापुढे नगरसेवकच राहणार नाहीत.

महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत.त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासक निर्णयासाठी राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते.त्यानुसार महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत.त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासक निर्णयासाठी राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते.त्यानुसार महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.कार्यकाळ संपल्याने महापालिकेच्या सर्व कार्यकारिणी रविवारी बरखास्त झाल्या.त्यामुळेच आता पालिका आयुक्त विक्रम कुमार प्रशासक म्हणून सर्व निर्णय घेतील.नगरसेवक व पदाधिकारी यांना असलेल्या सर्व सोयी सुविधा संपुष्टात येणार आहेत. यामध्ये महापौर पासून ते सर्व नगरसेवक पदावरून पायउतार होतील.दरम्यान महापालिकेवर प्रशासक राज्य आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे कामाचे विभाजन केले जाऊ शकते.स्थानिक पातळीवर अडचणी यापूर्वी नगरसेवकांकडे यायच्या त्या आता प्रशासनाला पहावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना आता नगरसेवकांचा कोणताही संबंध राहणार नाही.सर्वसामान्य नागरिकांना आता आपल्या अडचणी थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!