Raigad News

Raigad News : सराव करणाऱ्याचीच झाली शिकार… तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

15092 0

रायगड : रायगडमध्ये (Raigad News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Raigad News) भालाफेकीचा सराव करताना डोक्याला भाला लागून शालेय विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. माणगांवच्या वणी येथील शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वणी येथील आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करताना भाला थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला आणि त्याचा जागीत मृत्यू झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय स्पर्धेचे सराव सुरु होते. दरम्यान, भालाफेक खेळाचा सराव करताना ही दु: खद घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करणाराच भाल्याचा शिकार झाला. डोक्याला भाला लागून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याचं नाव हुजाईफा दावरे असे आहे.

पोलीस तपासात धक्कदायक माहिती उघड
मृत विद्यार्थ्याने स्वच:च फेकलेल भाला त्याच्या डोक्यात गेला आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र, तपासामध्ये पोलिसांना आढळलं की, दुसऱ्या विद्यार्थ्याने फेकलेला भाला डोक्याला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हुजाईफा दावरेने सराव करताना भाला फेकला. यानंतर समोरील विद्यार्थाने तो भाला उललला आणि परत हुजाईफा दावरेकडे फेकला आणि तो भाला मृत विद्यार्थाच्या डोक्याला लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियाला मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!